एक्स्प्लोर
जोगेश्वरीतील अनधिकृत व्यायामशाळाप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र वायकर अडचणीत
मुंबई : शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण जोगेश्वरी येथील व्यायाम शाळेप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर वायकर यांनी ही जागा म्हाडाल परत करण्याची तयारी दर्शवली आहे. पण म्हाडाने या जागेचा ताबा घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
जोगेश्वरी येथे राज्यमंत्री रवींद्र वायकर अध्यक्ष असलेल्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे व्यायामशाळा चालवली जाते. पण ही व्यायामशाळा अनधिकृत असल्याची तक्रार काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी लोकायुक्तांकडे केली होती.
निरुपम यांच्या तक्रारीनंतर व्यायामशाळेची देखभाल आणि व्यवस्थापनात स्वरस्य नसल्याचं कारण पुढे करत, वायकरांनी ही जागा म्हाडाला परत करण्याची तयारी दर्शवली. मात्र, याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल असल्याने, म्हाडाने या जागेचा ताबा घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या व्यायामशाळेचं बांधकाम अनधिकृत असल्यानेच, व्यायामशाळेची जबाबदारी झटकत असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement