ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा तर महामंडळ कोर्टात अवमान याचिका दाखल करणार
ST Workers Strike : , राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.
आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणारआहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.
तर दुसरीकेडे एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.
दरम्यान, राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.
राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातल्या 18 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. 31 ऑक्टोबर रोजी गणेशपेठ बस स्थानकावर या कर्मचाऱ्यांनी काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलंय. तर नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील 14 कर्मचारी, लातुर विभागातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील आगारातील 58 कर्मचारी, भंडारा आगारामधील 30 कर्मचारी, सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील २ कर्मचारी, यवतमाळ विभागातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१ आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपुर,आटपाडी आगारातील 585 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
संबंधीत बातम्या
ST workers Strike : आंदोलनकर्त्या एसटी कामगारांविरोधात कारवाईचा बडगा; 376 कर्मचारी निलंबित
BLOG : 'लालपरी'च्या सेवकांची फरफट अन् दमनकारी सरकारे!
St workers strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; लोकांना वेठीस धरू नये; अनिल परब यांचे आवाहन