एक्स्प्लोर

ST Bus Birthday : हॅपी बर्थ डे 'लाल परी'; महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचा 74 वर्षांचा प्रवास

ST Bus Birthday : आज लालपरीचा 'हॅपी बर्थडे'... महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटीचा आज वाढदिवस. एसटी, 'लालपरी' तर कुणासाठी 'लाल डब्बा' अशी या एसटीची ओळख आहे.

ST Bus Birthday : आज 'लालपरी'चा 'हॅपी बर्थडे'... महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटीचा आज वाढदिवस. एसटी, 'लालपरी' तर कुणासाठी 'लाल डब्बा' अशी या एसटीची ओळख आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतेय. महाराष्ट्रात पहिली एसटी सुरु झाल्यास आज 74 वर्ष पूर्ण झाली आहेत. अगदी खेड्यापाड्यांपासून शहरांना एकमेकांपासून जोडणारी अशी ही या लालपरीची ओळख आहे. कोरोनाकाळात बंद झालेली एसटी सध्या पुन्हा एकदा जोमानं धावू लागली आहे. कोरोनाकाळात महाराष्ट्राची जीवन वाहिनी बंद झाल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला होता. आणि त्यानंतर झालेला एसटीचा संप यामुळे ग्रामीण भागांचा शहरांसोबत जणू संपर्कच तुटला होता.  

लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. एसटी महामंडळातील पहिली एसटी इलेक्ट्रीक बस पुणे-अहमदनगर दरम्यान धावणार आहे. परदेशांमधील बसेस प्रमाणे ही नवीन बस असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. राज्यात टप्प्याटप्प्याने ल शिवाई बसेस सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

अमृत महोत्सवात पदार्पण करणारी 'लालपरी' 74 वर्षांपासून महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. अर्थात मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवासाची इतर साधनं सहज उपलब्ध असल्यामुळे शहरी भागात तितकंस नाही मात्र ग्रामीण भागांत या 'लाल डब्या'ची शानचं काही निराळी आहे. ग्रामीण भागांत लोक एसटीसाठी आजही तासनतास वाट पाहत बसलेले आढळतात. आजही वाहतुकीसाठी अनेकांच्या विश्वासाचा आधार फक्त एसटीचं आहे. या एसटीचा इतिहास तुम्हांला माहित आहे का?

महाराष्ट्रात पहिली एसटी केव्हा सुरु झाली? पहिली एसटी कोणत्या शहरांमध्ये धावली? तेव्हा एसटीचं तिकीट किती रुपये होतं? असा प्रश्न तुम्हांला कधी पडला आहे का? पडला असेल किंवा नसेल पडला तरी आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

1 जून 1948 रोजी पहिल्यांदा धावली 'लालपरी'
महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी धावली. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नावं अशी एसटीची ओळख. मात्र एसटी सुरु झाली तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. त्यामुळे याचं नाव होतं बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तेव्हा मुंबई , गुजरात आणि महाराष्ट्र मिळून 'बॉम्बे स्टेट' होतं. त्यामुळे 'बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन' असं एसटी महामंडळाचं नाव होतं. आणि पहिल्यांदा एसटी धावणारी दोन भाग्यवानशहरं होती अहमदनगर आणि पुणे. पहिल्या एसटी बसचा थाटचं वेगळा होता. किसन राऊत नावाच्या व्यक्तीला पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला, तर लक्ष्मण केवटे हे एसटीचे पहिले वाहक होते.

पहिली एसटी बस कशी होती ?
पहिल्या एसटी बसची रचना (Body) आजच्या सारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अ‍ॅल्युमिनिअमही नव्हतं. पहिल्या लालपरीला एक लाकडी बॉडी आणि वरुन कापडी छप्पर होतं. लाकडी बॉडी असलेल्या या पहिल्या बसची आसन क्षमता 30 होती. 1 जून 1948 रोजी सकाळी ठिक 8 वाजता ही पहिली एसटी बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली आणि या बसचं तिकीट अडीच रुपये होतं.

ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
एसटीला अहमदनगर ते पुणे प्रवासादरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसन क्षमतेमुळे ते शक्य नव्हतं. ज्या गावांमधून पहिली एसटी जाणार होती त्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनं तशी अभावानंच पहायला मिळणाऱ्या या दिवसांमध्ये लोकांना या गाडीचं अप्रूप वाटणं सहाजिक होतं. गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. नवीन वाहनं आणल्यावर आज आपल्याकडे सवासिनी त्याची पुजा करतात किंवा आजही एखाद्या गावात एसटीची सेवा सुरु झाली तरी अशी पुजा केली जाते. तेव्हाही गावागावांमध्ये सवासिनी पुजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. एसटी गावात पोहोचली की तिची पुजा केली जाई.

पोलीस बंदोबस्तात धावली पहिली एसटी बस
पुण्यामध्ये शिवाजीनगर जवळच्या कॉर्पोरेशन जवळ या बसचा शेवटचा थांबा होता. मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्यानं या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली.

1 जून 2022 या दिवशी या घटनेला 74 वर्षे पूर्ण होतील. आजही त्याचं निश्चयाने एसटी लोकांना गावोगावी पोहोचवण्याचं काम करत आहे. आता तर अत्यंत आकर्षक शिवशाही, शिवशाही स्लीपर कोच, शिवनेरी, अश्वमेघ, विठाई, विना वातानुकूलित शयनयान अशा नव्या रुपात आरामदायक प्रवासाचा आनंद देत आहे. या 72 वर्षात अनेक उन्हाळे , पावसाळे एसटीनं अनुभवले त्याचा तितक्याच हिंमतीने आपल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संघर्ष देखील केला. ज्या प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी विविध सवलती दिल्या जातात त्याच प्रमाणे आता एसटी देखील ज्येष्ठ नागरिक झाल्याने एसटीला सरकारनं विविध सवलत द्यायला हवी, जसे की प्रवाशी कर, इंधन कर, टोल टॅक्स यातून एसटीला सवलत दिल्यास एसटीला आणखी भरभराटीचे दिवस येतील यात शंका नाही .

सध्या कोरोना या महामारीनं सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला आहे . मात्र या महामारीच्या काळात देखील एसटी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धावली . परप्रातीयांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी धावली . इतकंच नाही तर कोरोनाच्या या महामारीच्या वातावरणात ज्येष्ठ झालेली एसटी आता प्रवाशी वाहतुकीबरोबरच स्वतःच्या अंगावर मालवाहतुकीचं ओझं सहन करून इच्छित स्थळी पोहचवणार आहे .

शेतकरी, व्यापारी, उद्योजक, लघु उद्योजक यांना माफक दरात ही मालवाहतूक सेवा एसटी देणार आहे . साहजिकच एसटीची सेवा ही विश्वासार्ह असल्यानं अल्पावधीत एसटीच्या या मालवाहतूक सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे . एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. 31 विभागीय कार्यालयं, 33 विभागीय कार्यशाळा असा मोठा विस्तार आहे . एका आगाराला साधारण 11 मालवाहू एसटी ट्रक असे साधारण अडीचशे ते तीनशे एसटी ट्रक लवकरच उपलब्ध करून देण्याचा एसटी प्रशासनाचा मानस आहे .

एसटी मालवाहू ट्रक हा उपक्रम जरी नवा असला तरी काही सेवा निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मते अशा एसटी ट्रक एसटीचे विविध स्पार्ट्स , साहित्य , टायर यांची ने -आण करण्यासाठी एसटीच्या विविध विभागात आज ही कार्यरत आहे . फरक फक्त एवढाच आहे की, ही सेवा फक्त एसटी विभागापुरती मर्यादित आहे . मात्र आता सर्व प्रकारच्या माल वाहतूकीसाठी एसटीची ट्रक सेवा ही शेतकरी, व्यापारी ,उद्योजक , लघु उद्योजक, यांच्यासाठी माफक दरात उत्तम सेवा आहे . एसटीच्या या मालवाहतुकीसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष निर्माण केलेत . एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी एसटीची मालवाहू सेवा नक्कीच संजीवनी ठरेल असा विश्वास एसटी प्रशासनाला आहे .

स्पर्धेच्या या युगात ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली, तुमच्या - आमच्या सुख -दुःखाला धावून येणाऱ्या या एसटीला संजीवनी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष भेद विसरून यासाठी प्रयत्न करायला हवेत . ग्रामीण भागातील जनतेच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या या एसटी ला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
Embed widget