एक्स्प्लोर
कोकणात जाणाऱ्या विशेष एक्स्प्रेस फुल, तर तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ
कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर तसंच जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
मुंबई : दिवाळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोडलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील विशेष एक्स्प्रेस फुल झाल्या आहेत. त्यामुळे कोकणकन्या, जनशताब्दी, तेजस, राजधानीसह विशेष एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी वाढली आहे. या एक्स्प्रेला प्रवाशांची जास्त पसंती आहे.
दिवाळीतील प्रत्येक एक्स्प्रेसची एसी, नॉन एसीची प्रतीक्षा यादी 300 ते 400, एक हजार ते बाराशे आहे. तर, विशेष एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी 30 ते 40 आहे. काही विशेष एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध आहे. या विशेष गाड्यांचा प्रवाशांनी वापर करावा असं आवाहन रेल्वेने केलं आहे.
तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर, जनरल डब्यामध्ये वाढ
कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर तसंच जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान स्लीपरचा एक डबा तर 3 जनरल डब्यामध्ये वाढ करण्यात आले आहेत. अप, डाऊन अशा दोन्ही मार्गावर डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
जागा गाड्यांची सोय
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी जादा विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी रात्री 1.10 वाजता करमळीसाठी गाडी सोडण्यात येईल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. तर करमळीहून दर शुक्रवारी 2 वाजता सुटणारी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे 3.40 वाजता पोहोचेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement