एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम
सांगलीतल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेची मुजोरी सुरुच आहे. कोठडीत सरकारी जेवण नको, तर घरगुतीच डबा हवा, अशी मागणी त्यानं केली आहे. तसंच सीआयडी पथकाला कामटेसह इतर आरोपी सहकार्य करत नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
सांगली : सांगलीतल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेची मुजोरी सुरुच आहे. कोठडीत सरकारी जेवण नको, तर घरगुतीच डबा हवा, अशी मागणी त्यानं केली आहे. तसंच सीआयडी पथकाला कामटेसह इतर आरोपी सहकार्य करत नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
पैशांसाठी दमदाटीच्या आरोपात पोलिसांनी अनिकेत कोथळेला 5 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर कोठडीत त्याला थर्ड डिग्री वापरल्याने त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, अनिकेतच्या मृत्यूनंतर कामटे आणि त्याच्या पथकाने मृतदेह जाळून परस्पर विल्हेवाटही लावली. तसेच अनिकेत आणि त्याचा मित्र अमोल भंडारे या दोघांनी पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा बनाव रचला होता.
मात्र, यानंतर हे संपूर्ण प्रकरण एक मोठं सेक्स रॅकेट लपवण्यासाठी केलं गेल्याचं समोर येत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी डझनभर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर कामटे आणि त्याच्या पथकातील इतर सरकाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी सुरु आहे.
पण चौकशीदरम्यान, कामटेच्या पथकाकडून असहकार्य मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच कोठडीत सरकारी जेवण नको, तर घरगुतीच डबा हवा, अशी मागणी त्यानं केली आहे.
दुसरीकडे सीआयडीने या प्रकरणात वापरण्यात आलेल्या पोलीस व्हॅनसोबत पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेची बुलेटही जप्त केली आहे.
दरम्यान, आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर अनिकेतच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
संबंधित बातम्या
गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे
मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल
अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित
कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?
अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?
मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?
सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement