एक्स्प्लोर

सोमेश्वर कारखान्याचा विक्रम, शेतकऱ्यांना विक्रमी दर देणारा राज्यातील पहिला साखर कारखाना, नेमका किती दिला दर?

Someshwar Sugar Factory : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं (Someshwar Cooperative Sugar Factory) मोठा विक्रम केला आहे. मागील 2023-2024  गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना ठरला आहे.

Someshwar Cooperative Sugar Factory : बारामती (Baramati) तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं (Someshwar Cooperative Sugar Factory) मोठा विक्रम केला आहे. मागील 2023-2024  गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना ठरला आहे. संपूर्ण राज्यात एफआरपीपेक्षा (FRP) प्रति मेट्रीक टन  ऊसाला 697 रुपये जास्त दर सोमेश्वर कारखान्याने दिला आहे. त्यामुळं अनुदानासह शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन दर हा 3771 रुपये दर जाहीर केलाय. सर्वात जास्त दर देणारा सोमेश्वर साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. 

 एफआरपीपेक्षा तब्बल 697 रुपये जास्त 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2023-2024 साठी ऊसाला प्रती टन अनुदानासह 3771 रुपये दर जाहीर केलाय. एफआरपीपेक्षा तब्बल 697 रुपये जास्त दर देण्यात आला आहे. अशा प्रकारे जादा दर देणारा सोमेश्वर राज्यात पहिलाच कारखाना ठरल्याची माहिती माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलीय. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखान्यावर असणारे लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळे सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम राखू शकला, अशी माहिती जगताप यांनी दिलीय. 

5 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन ऊसाचे गाळप 

कारखान्याने गत हंगामासाठी 3571 रुपये उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे. सभासद व बिगर सभासदांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसास 75  रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसास 100 रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसास 150 रुपये व नंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. अनुदानासह जानेवारीमध्ये तुटलेल्या उसास 3646 रुपये, फेब्रुवारीमधील उसाला 3671 रुपये, मार्चसाठी 3721 रुपये दिला गेला आहे. तर मार्चनंतर तुटलेल्या ऊसाला 3771 रुपये दर जाहीर केलाय. गत हंगामात सोमेश्वरने एकूण 15 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, बी हेवीसह सरासरी 12.21 टक्के साखरउतारा राखत 18 लाख 26 हजार 500 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. गत हंगामाची एफआरपी 2 हजार 873 रुपये होती. त्यापैकी आजवर 3 हजार 100 रुपये दिले आहेत. पुढील महिन्यामध्ये 100 ऊस प्रोत्साहन अनुदान हे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

आमचा अंतिम दर हा मेरीटवर ठरतो  : पुरुषोत्तम जगताप 

मागील हंगामात ऊसाची कमतरता होती. या काळात देखील 15 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. आमच्या कारकान्याची रिकव्हरी  ही 12.21 आहे. कारखान्यावर डिस्टलरी प्रोजक्ट, को जनरेशन आहे. तसेच साखर विक्रीला देखील चांगला दर मिळाला, त्यामुळं आम्हाला शेतखऱ्यांना चांगला दर देणं शक्यत झाल्याचे सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितलं. आम्ही इतर कोणत्याही साखर कारखान्यांशी स्पर्धा करत नाही. आमचा अंतिम दर हा मेरीटवर ठरतो असे जगताप म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदांदा यांच्या मार्गदर्शनालाखाली योग्य नियोजनाद्वारे काम करत असल्याचेही ते म्हणाले. आमचा साखर कारखाना हा साडेसात हजार मेट्रीक टनाने चालतो. तसेच २३ मेगावॅटची वीज निर्मिती होते. दिवसाला 45000 लिटर अल्कहोल तयार करणारी डिस्टलरी आहे. पुढच्या काळात दिवसाला 135000 लिटर अल्कहोल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरु असल्याचे जगताप म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

सोलापूरचे अभिजीत पाटील, सांगलीचे मानसिंग नाईक यांच्यासह नव्या पाच कारखान्यांना मदत, 16 कारखान्यांच्या यादीचा नवा प्रस्ताव

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Embed widget