एक्स्प्लोर
धुळ्यात परतताच जवान चंदू चव्हाणला अश्रू अनावर
![धुळ्यात परतताच जवान चंदू चव्हाणला अश्रू अनावर Soldier Chandu Chavan Come Back His Home In Borvihir Dhule धुळ्यात परतताच जवान चंदू चव्हाणला अश्रू अनावर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/11142701/Chandu_Chavan_3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर धुळ्यात परतला आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः त्याला घेऊन धुळ्यात परतले. बोरविहिर या आपल्या गावी आल्यानंतर चंदू चव्हाणला अश्रू अनावर झाले.
मृत आजीच्या आठवणीने चंदू चव्हाणचे डोळे पानावले. अगोदर आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार असल्याचं त्याने सांगितलं. चंदू जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार नाही, असं चंदूच्या भावाने सांगितलं होतं. चंदू पाकच्या तावडीत गेल्याचं वृत्त कळताच आजीचं धक्क्यानं निधन झालं होतं.
बोरविहिर गावातील महिलांचे चंदूला पाहून डोळे पानावले. धुळ्यात पोहचल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नमन करुन चंदू गावी रवाना झाला. त्यापूर्वी धुळ्यात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
कोण आहे चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचा आहे. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाला. 22 वर्षीय चंदूनं दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदूचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंट मध्ये कार्यरत आहे
29 सप्टेबरला चंदूनं चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला होता. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं.
चंदू चव्हाणला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाणला मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. अखेर पाकिस्तानने चंदू चव्हाणची सुटका केली.
संबंधित बातम्या :
भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली
जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!
22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं
पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा
धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)