एक्स्प्लोर
पोलीस दलात भरती होण्यासाठी लढवली अजब शक्कल, उंची कमी असल्याने विग लावून भरतीत उतरला अन्...
पोलीस दलात भरती होण्यासाठी सोलापुरात एका व्यक्तीने लढवलेली शक्कल पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. उंची कमी असल्यामुळं एका तरुण चक्क विग लावून पोलीस भरतीमध्ये उतरला. मात्र भरती दरम्यान त्याचं बिंग फुटलं.
सोलापूर : पोलीस दलात भरती होण्यासाठी सोलापुरात एका व्यक्तीने लढवलेली शक्कल पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. उंची कमी असल्यामुळं एका तरुण उंची वाढविण्यासाठी चक्क विग (बनावट केसांचा टोप) लावून पोलीस भरतीमध्ये उतरला. मात्र भरती दरम्यान त्याचं बिंग फुटलं. तरुणाचे केस हे बनावट असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रभुराम प्रकाश गुरव असे गुन्हा दाखल 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे. प्रभुराम हा मूळचा पंढरपुरातील शेवते गावचा राहिवासी आहे. सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2019 मध्ये सोलापूर शहर पोलीस दलातील 88 पोलीस शिपाई पदांकरता पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. सोलापूर शहर मुख्यालयात ही प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी कागदपत्रांची तपासणी, छाती, उंची, तसेच शंभर मीटर धावणे, गोळाफेक इत्यादी चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये अनेक तरुण पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने सहभागी झाले होते.
तसाच प्रभुराम गुरव हा तरुण देखील या भरतीमध्ये सहभागी झाला होता. पोलीस दलात भरती होण्यासाठी 165 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे. मात्र प्रभुराम याची उंची 163.5 इतकी आहे. भरती होण्यासाठी असलेल्या अटीपेक्षा जवळपास दीड सेंटिमीटर उंची कमी होती. त्यासाठी त्याने चक्क बनावट केस अर्थात विगचा वापर केला.
मात्र तपासणी करणाऱ्या पोलिसाला प्रभुरामवर शंका आल्याने त्यांनी त्याची संपूर्ण तपासणी केली. तपासणी केल्यानंतर त्याने विग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे विग घातल्यानंतर देखील त्याची उंची 165 सेंटीमीटर इतकी झाली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
प्रभुरामने लावलेल्या या शकलीमुळे भरतीवेळी उपस्थित सर्वजणच थक्क झाले. मात्र विग लावून शासनाची फसवणूक करून, सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. भांदवि कलम 417, 420 प्रमाणे सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोसई हनुमंतराव बादुले हे करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement