एक्स्प्लोर

ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा?

ठाणे: ठाणे पोलिसांनी कारवाई केलेल्या इफेड्रीन ड्रग प्रकरणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण तब्बल 2 हजार कोटीच्या या ड्रग प्रकरणी गुजरातमधील काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचं नाव आता समोर येत आहे.   एका नायझेरीयन व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर 2 हजार कोटी किमतीच्या या ड्रगचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. मात्र आणखी मोठे मासे अजून गळाला लागण्याची शक्यता आहे.   ड्रग्ज प्रकरणाचे सोलापूरशी धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी धानेश्वर राजाराम स्वामीला अटक केली. चौकशीतून राजेंद्र डीमरी नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. पोलिसांनी पुण्यातून स्वामीला अटक केली. त्याच्याकडे साडेपाच किलो इफेड्रीन सापडलं. त्यानंतर पोलीस सोलापुरातील त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचले.   अव्होन ऑर्गनिक्स, अव्होन मेडिसायन्सेस आणि अव्होन लाईफ सायन्सेस अशा वेगवेगळ्या नावाने कार्यरत असलेल्या सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतली एक वादग्रस्त कंपनी. सुरुवातीपासूनच या कंपनीतल्या उत्पादनावर संशयाने पाहिलं जायचं. अखेर १५ एप्रिल २०१६ रोजी ठाणे आणि अहमदाबाद पोलिसांनी मारलेल्या छाप्यात या कंपनीच खरं रूप समोर आलं.   औषध निर्मितीच्या नावाखाली अमली पदार्थ बनवले जात असल्याच उघड झालं. तब्बल दोन हजार कोटींचा अमली पदार्थाचा साठा इथं सापडला.   सुरुवातीला धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोन आरोपींना जेरबंद केलं. त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सोलापूरच्या अव्होनपर्यंत येऊन पोहोचला. पण सोलापूर ते युरोप व्हाया गुजरात अशी होणारी अमली पदार्थांची तस्करी यानिमित्ताने उघडकीस आली. ठाणे अमली पदार्थ विरोधी पथक आणि अहमदाबाद एटीएसच पथक अव्होनच्या कारभाराची चौकशी करतंय. इफेड्रीनचा आणखी साठा कंपनीत असावा असा संशय तपास पथकाला आहे. तो शोधण्यासाठी प्रयत्न चालले आहेत.   पोलिसांनी 571 किलो इफेड्रीन आणि 8541 किलो सूडो इफेड्रीन ड्रग जप्त केलं. या दोन्ही ड्रग्जचा वापर कोकीन सारखं ड्रग बनवण्यासाठी वापर केला जातो.   पोलिसांनी 5 जणांना अटक केलं असलं तरी अद्याप पुनीत श्रृंगी, जय मुखी आणि काँग्रेसच्या माजी आमदाराचा मुलगा किशोर राठोडचा शोध सुरु आहे. त्यामुळं या प्रकरणातले मास्टरमाईंड पोलिसांच्या गळाला कधी लागणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget