एक्स्प्लोर
कर्ज फेडण्यासाठी हुंड्याची मागणी, विवाहितेची आत्महत्या

सोलापूर : एकीकडे 'एबीपी माझा'च्या पुढाकाराने राज्यभरातील तरुणाई हुंड्याविरोधात एकवटली असताना सोलापुरात हुंडाबळीची विदारक घटना समोर आली आहे. मोहोळमध्ये हुंड्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. शहनाज मुलाणी या महिलेने हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं. गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेवर सासरच्यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मोहोळ पोलिसात 8 दिवसांनी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. शहनाज मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम गावची रहिवासी होती. 5 मे 2015 रोजी सोलापूरमधील बार्शीतल्या शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. कळसेनगरात नांदायला आलेल्या शहनाजचा पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी शहनाजकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून 19 एप्रिलला शहनाजने स्वतःला पेटवून घेतलं. 20 तारखेला तिचा मृत्यू झाला. चौकशीनंतर मोहोळ पोलिसांनी पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या :
एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेला भरघोस प्रतिसाद
22 वर्षांपूर्वी घेतलेला 40 हजारांचा हुंडा परत, पत्रकाराचा निर्णय
हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही, मराठवाड्यातील तरुणांचा एल्गार
हुंडा मागणाऱ्याला धडा, लग्न मोडून नवरदेवाविरुद्ध पोलिसात तक्रार
ब्लॉग : पोलीस 10 लाख, IAS 1 कोटी, मराठवाड्यातील हुंड्याचं रेटकार्ड
BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!
हुंडा मागणाऱ्यांसाठी धडा, औरंगाबादच्या रत्नमालाची आदर्श कहाणी
मुलीच्या लग्नासाठी हुंडा नाही, लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
हुंडा घेणारे षंढ, असदुद्दीन ओवेसींचा घणाघात
आधी मोहिनी, आता शीतल, भिसे वाघोलीला हुंड्याचा कलंक!
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या
आणखी वाचा























