पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
Solapur Akkalkot Accident:ही ट्रॅव्हल्स बस पुण्याहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाली होती. बसमध्ये सुमारे 30 ते 35 भाविक प्रवास करत होते.

Accident: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कर्जाळा गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याहून अक्कलकोटकडे देवदर्शनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्स बसने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून, 30 ते 35 भाविक असलेल्या बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे.
नेमकं घडलं काय?
सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कर्जाळा गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल्स बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. ही ट्रॅव्हल्स बस पुण्याहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाली होती. बसमध्ये सुमारे 30 ते 35 भाविक प्रवास करत होते. कर्जाळा गावाजवळ महामार्गाच्या कडेला ट्रक उभा असताना, भरधाव वेगाने आलेल्या बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली होती. ट्रकला मागून धडक बसल्याने ट्रॅव्हल्सचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला होता. स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे.
जखमींवर उपचार सुरु
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि आपत्कालीन सेवांच्या मदतीने अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलं. काही जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने अक्कलकोट आणि सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.अपघाताचा नेमका कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचा वेग आणि निष्काळजीपणाही यामागे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत.
हेही वाचा:
मोठी बातमी : फ्लॅटला आग, बापाची दोन मुलांसह खिडकीतून उडी, तिघांचा मृत्यू, द्वारका हादरली!
























