एक्स्प्लोर
सोलापुरात हातभट्टीवर छापा, 315 बॅरल, 6250 लिटर दारु जप्त

सोलापूर : सोलापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज मोठी कारवाई केली आहे. हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापा टाकत या पथकाने दारुच्या 315 बॅरल जप्त केल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी धाड टाकली. दारु बनवण्यासाठी लागणारं 62 हजार लिटर रयासन, 6 हजार 250 लिटर हातभट्टी दारु, रबरी ट्यूब आणि काही मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाने 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एकूण 18 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
आणखी वाचा























