एक्स्प्लोर

मोठी बातमी! अंजली दमानिया यांची मोठी घोषणा, परिवर्तनासाठी महाराष्ट्रात काढणार नवीन राजकीय पक्ष

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक मोठी घोषणा केलीय. अंजली दमानिया यांनी नवीन राजकीय पक्ष (New Political Party) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अंजली दमानिया यांनी नवीन राजकीय पक्ष (New Political Party) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परिवर्तन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तत्व सिद्धांत यावर काम करणारे लोक या पक्षात असतील. इथून तिथून उड्या मारणारे लोक यात नसतील असे दमानिया म्हणाल्या. 

पक्ष नव्हे ही क्रांती असणार

दरम्यान, अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीपासून आम्ही निवडणुका लढवणार आहोत. हा पक्ष नव्हे ही क्रांती असणार आहे. हा सामन्यांचा पक्ष असणार आहे, असंही दमानिया म्हणाल्या. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या पक्ष काढण्याच्या निर्ँणयानं महाराष्ट्रात आणखी एका नवीन राजकीय पार्टीचा उदय झाला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या नवीन पक्षाचे नेमकं नाव काय असणार? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

महाराष्ट्रच राजकारण एक गटारगंगा

महाराष्ट्रच राजकारण एक गटार गंगा झाली आहे. निवडणुकीत मोठ्या पक्षाचा जनरल सेक्रटरी पैसे पाठताना पकडले गेल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. हे चौथी पास असणारे नेते देशाला कोणती दिशा देणार अशी टीका देखील अंजली दमानिया यांनी केली. ज्या लोकांना देशासाठी तळमळ आहे, त्यांना घेऊन सामान्य माणसासाठी हा पक्ष काढला जाईल. जनतेची क्रांती काय असते, आमचा पक्ष आल्यावर हे इतर पक्ष हादरतील असेही दमानिया म्हणाल्या. 

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले आहेत. राजकारण हे घाण आहे पण ते करावं लागणार असल्याचे दमानिया म्हणाल्या. लाडकी बहीण योजना बहिणींना सक्षम बनवण्यासाठी वापरली असती तर बरे झाले असते. ही लाच दिली गेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला भिकारी बनवू नका. हे कराचे पैसे आहेत असे दमानिया म्हणाल्या. 

कोण आहेत अंजली दमानिया?

अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी 2012 मध्ये आरटीआय कायद्याद्वारे (RTI Act) कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले होते. त्यावेळी त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली होती. यात त्यांचा मोठा पराभव देखील झाला होता. 2015 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील भष्ट्राचाराचे आरोप केले होते. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या होत्या. 2016 मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषणही केले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या:

अजित पवार ,वडेट्टीवार 10 वी पास, संतोष बांगर 4 थी पास, मग लिपिक भरतीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट का? दमानिया यांनी 10 आमदार-मंत्र्यांचं शिक्षण काढलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget