Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जून 2021 | मंगळवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज्यात काल दिवसभरात 8 हजार 129 कोरोनाबाधितांची नोंद, 14732 कोरोनामुक्त, 2 मार्चनंतर आढळला इतका कमी आकडा
2. जून अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास नाहीच; राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मुंबई पहिल्या गटात आल्यानंतर लोकलसेवा सुरु
3. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आषाढीला पालख्या एसटीनेच, एकादशी दिवशी 195 महाराज मंडळींना विठुरायाचं मुखदर्शन
4. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर SEBC प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार, सामान्य प्रशासन विभागानं घेतला मोठा निर्णय
5. खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र, सरकारवर टीकास्त्र
6. जालना जाफराबादमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती, परवानगीशिवाय तपासणी केल्याप्रकरणी 2 फौजदार, 5 पोलीस निलंबित
7. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर संघाची बैठक, साखर कारखान्याशी संबंधित नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
8. नोव्हावॅक्स कंपनीची कोरोनावरील लस 90 टक्के प्रभावी, अमेरिकेतील तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर केला दावा
9. भारतीय पुरातत्व विभागात्या अख्त्यारित येणारी सर्व पर्यटनस्थळं 16 जूनपासून सुरु, कोरोना नियमांचं पालन करत नागरिकांना प्रवेश
10. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'लगान' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 वर्षे पूर्ण; सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंडमध्ये, कलाकारांनीही जागवल्या चित्रपटाच्या आठवणी