एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 ऑक्टोबर 2019 | शनिवार | ABP Majha
देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- हायकोर्टाच्या आदेशानंतर मध्यरात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड, पोलिसांकडून आंदोलक पर्यावरणप्रेमींची धरपकड, आदित्य ठाकरेंचाही वृक्षतोडीला तीव्र विरोध
- मित्रपक्षही कमळाच्या चिन्हावर 12 जागा लढणार, मुख्यमंत्र्यांकडून फॉर्म्युला जाहीर, सेनेशिवाय बहुमत गाठण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- बंडखोरांना जागा दाखवून देऊ, संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा इशारा, अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोरांना दोन दिवसांचा अल्टिमेटम
- तावडे, बावनकुळे, मेहता आणि पुरोहितांचा पत्ता कट, तिकीट न मिळाल्यानं मेहता समर्थकांचा राडा, तर खडसेंऐवजी कन्या रोहिणी यांना उमेदवारी
- उमेदवारी अर्ज दाखल करताना नेत्यांचं शक्तिप्रदर्शन, नागपुरात मुख्यमंत्री, बारामतीत अजित पवार, येवल्यात भुजबळ, शिर्डीतून राधाकृष्ण विखेंचा शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज
- नितीन गडकरींचा आशीर्वाद माझ्यासोबत, काँग्रेस उमेदवार आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा
- राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, माजी खासदार संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
- गद्दारांचा ‘अन्याय’ निष्ठावान सहन करणार नाही, राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी
- शिवरायांबाबत अक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला बसपाकडून उमेदवारी, अहमदनगर शहर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
- भारताविरोधात पाकिस्तानचं नवं षडयंत्र, काश्मीर मुद्द्यावर पीओकेवासियांचा एलओसीवर मार्च काढणार, हिंसा झाल्यास भारताची बदनामी करण्याचा डाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement