एक्स्प्लोर

श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका, अज्ञातस्थळी रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला जामीन मंजूर झाल्याने त्याची आज (मंगळवार) नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला जामीन मंजूर झाल्याने त्याची आज (मंगळवार) नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने छिंदमला सशर्त जामीन मंजूर केला आहे. शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा छिंदमवर दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यात शुक्रवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. अखेर  नाशिक कारागृहातून आज दुपारी त्याची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर तो अज्ञातस्थळी गेल्या असल्याची माहिती समजते आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन जनतेची माफी मागितली होती. मात्र, आता छिंदमनं ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.” असंही म्हटलं होतं. सरकारी वकिलांनी छिंदमच्या जामिनाला तीव्र आक्षेप घेतला होता. छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जामीन मंजूर केला. त्यामुळे जेल प्रशासनाने त्याची सुटका केली. काय आहे प्रकरण? श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती. संबंधित बातम्या :

छिंदमला जामीन मंजूर, कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार

उपमहापौर छिंदमचा राजीनामा मंजूर, नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी

छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्ताप

शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम

शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे

श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत

नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget