एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसामध्ये करावा असेही त्या नगरसेवकांना कळवण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

मुंबई : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावलला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये? असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसामध्ये करावा असेही त्या नगरसेवकांना कळवण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला? अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली आणि जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. मात्र नगरमध्ये शिवसेनेचा गेम कसा काय झाला, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. मात्र निवडणूक गाजली, ती तिथे झालेल्या अनपेक्षित युतीमुळेच. दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेचा निकाल लागला. 68 जागा असलेल्या अहमदनगरमध्ये बहुमतासाठी 35 जागांची बेगमी करावी लागते. अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली. अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना  24 राष्ट्रवादी 18 भाजप 14 काँग्रेस 5 बसपा 4 सपा 1 अपक्ष 2 पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली. अहमदनगरमध्ये कमळ कसं फुललं? भाजप            14 राष्ट्रवादी         18 बसपा             04 अपक्ष             01 एकूण            37 शिवसेनेचा गेम कसा झाला? शिवसेनेचे अहमदनगरमधील सूत्रधार अनिल राठोड हे खासदार दिलीप गांधी यांच्याशिवाय भाजपची साथ घेण्याचा अट्टाहास करत होते. त्यामुळे भाजपकडे शिवसेनेचा कोणताही अधिकृत प्रस्तावच गेला नाही. भाजपने 'आपल्याला हवा तसा' प्रस्ताव पाठवावा, असा शिवसेनेचा हट्ट होता. बहुदा भाजप तटस्थ राहील आणि बसप, तसेच तीन अपक्षांच्या साथीने आपला महापौर होईल, असा त्यांचा कयास होता. भाजपचे चाणक्य त्याचवेळी नेमकं काय करावं, या पेचात होते. भाजप आमदार शिवाजी कर्डीले गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना 'सह्याद्री'वर भेटले. आमदार कर्डिलेंचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या संपर्कात आले. दोघांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपने महापौर-उपमहापौर आमचाच होईल, असा दावा केला. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सकाळी भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. भाजप नगरसेवकांच्या जोडीनेच राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सभागृहात गेले. भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांना एकत्र पाहून शिवसेनेचा गेम झाला, हे उघड झालं. अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे आदेश असतानाही नगरसेवकांनी भाजपला मत का दिलं? याची चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नगरसेवकांकडून खुलासा मागितला असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे आधी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा आणि मग कारवाईचा इशारा अशी दुतोंडी भूमिका राष्ट्रवादी बजावत आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापौर निवडणुकीतली ही यारी-दोस्ती लक्षणीय ठरली आहे. देशासह राज्यात आघाडी-महाआघाडीचे वारु दामटवण्याचा प्रयत्न सुरु असताना अहमदनगरने मात्र वेगळंच राजकीय वळण घेतलं. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होतोय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
Madan Bhosale: साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील घरातून हसतहसत बाहेर पडले, राजकीय चर्चांना उधाण
पश्चिम महाराष्ट्रात तुतारीचा भाजपला आणखी एक हादरा? जयंत पाटील साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी
Kolhapur News : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Monsoon :  तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 25 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJayant Patil Meet Madan Bhosale : जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाBaramati Yugendra Pawar Banners : बारामतीत युगेंद्र पवारांची हवा, फिक्स आमदार असल्याचे बॅनर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
Madan Bhosale: साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील घरातून हसतहसत बाहेर पडले, राजकीय चर्चांना उधाण
पश्चिम महाराष्ट्रात तुतारीचा भाजपला आणखी एक हादरा? जयंत पाटील साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी
Kolhapur News : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
Bigg Boss Marathi :
"डीपी दादा काडी लावायचं काम करतात, माझ्या आणि निक्कू ताईत...", छोटा पुढारीचा आरोप; धनंजय म्हणाला...
एकनाथ खडसे म्हणतात, निमंत्रण मिळालं नसल्याने मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, आता अनिल पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, निमंत्रण मिळालं नसल्याने मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, आता अनिल पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय!
राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय!
परभणीकरांना दिलासा! पुर्णा, गाेदावरी, दुधना खळाळल्या, दोन दिवसांच्या पावसाने निम्न दुधनासह येलदरीतही पाणी वाढलं..
परभणीकरांना दिलासा! पुर्णा, गाेदावरी, दुधना खळाळल्या, दोन दिवसांच्या पावसाने निम्न दुधनासह येलदरीतही पाणी वाढलं..
Embed widget