एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्रीपदाचा आदर करतो, व्यक्तीचा नाही : संजय राऊत
गोवा : आम्ही मुख्यमंत्रीपदाचा आदर करतो, त्या व्यक्तीचा नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मग समोर यावं, मग कळेल शिवसेना काय आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास
मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईतील गोरेगाव इथे झालेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात शिवसेनेवर चौफेर हल्ला चढवला होता. हातात भगवा घेऊन हप्ते मागण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. तसंच जागा वाटपामुळे नाही तर पारदर्शक कारभाराच्या अजेंड्यामुळे युती तुटल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.मुख्यंमंत्र्यांच्या घणाघाती भाषणावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
मात्र शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या पक्षाने खंडणीखोर, बलात्कारी, खुनांचे आरोपी यांना पवित्र करून पक्षात प्रवेश दिला, त्यांनी शिवसेनेला खंडणीखोर म्हणू नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत दुर्योधन, शकुनी मामा असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे भाजपने आपल्या पक्षाकडे एकदा पाहावं आणि मग सेनेवर बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू : मुख्यमंत्री
यापूर्वीही शिवसेनेतून मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती. “मुख्यमंत्री एका नाटकाचे दिग्दर्शक वाटत होते. वेगवेगळ्या किरधारात स्वतःला रंगवत होते. यामधून अहंकार दिसत होता. स्वतःला राम किंवा कृष्ण म्हणून तसं होता येत नाही. तुम्ही कर्म काय करता यावर सर्व भूमिका ठरत असतात.”, असं म्हणत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रतिहल्ला केला होता. पाहा व्हिडिओ : संबंधित बातम्या :युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: सूत्र
युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
निवडणुकांची रणधुमाळी आजपासून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement