
Sanjay Raut : शिवसेनेची सत्ता येणार, सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाणार; संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut : आमची सत्ता येईल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला.

Sanjay Raut On State Govt : 2024 ला शिवसेनेची (shivsena) सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. जी कारवाई करायची ती आत्ताच करा. आमची सत्ता येईल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. संजय राऊतांनी आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर जोरदार टीका केली.
काही लोकांना कोरोनापेक्षा भारत जोडो यात्रेचं भय
दोन वर्षापूर्वी ट्रम्प गुजरातला आले तेव्हा कोरोनाचा कहर होता. तेव्हा कोरोना नव्हता का? गुजरातमध्ये मतदानाच्या शेवटपर्यंत रोड शो चालू होते. तेव्हा कोविडची भीती नव्हती का? असा सवाल राऊतांनी केला. भारत जोडो यात्रेला जे समर्थन मिळत आहे. लोकांची जी गर्दी होत आहे. भारत जोडो यात्रेमुळं नफरत विरुध्द प्रेम हा सामना सुरु झाला आहे. लोकांच्या मनापर्यंत प्रेम पोहोचलं आहे. त्याचं काही लोकांना कोरोनापेक्षा जास्त भय असल्याचं राऊत म्हणाले.
संकटाच्या काळाज जे पक्षासोबत ते जवळचे
जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे असतात. गेलेले आमदारही माझ्या जवळचे होतो. एकनाथ शिंदे, दादा भुसे, उदय सामंत हे जवळचे होते असे राऊत म्हणाले. संकटाच्या काळाज जे पक्षासोबत असतात तेच खरे जवळचे असल्याचे संजय राऊत म्हणाले. पळपुटे येतात आणि जातात. आज इथे उद्या तिथे असे म्हणत राऊतांनी शिंदे गटातील आमदारंवर टीका केली. हे कोणी लोकनेते नव्हते, पक्षानी त्यांना मोठे केले होते असेही राऊत म्हणाले. पक्षामधून काही लोक बाजूला झाले असतील तर ठिक आहे. कोणत्याही राजकीय पक्षात लोक येत असतात, जात असतात. कधी काळी भाजपामधून लोक निघून जात होते. आता सत्ताधाऱ्यांनी धडकी भरवणारी भारत जोडो यात्रा सुरु आहे. ज्याची मुळं खोलवर रुजलेली असतात तो पक्ष कधीही संपत नसतो असेही राऊत म्हणाले. काही स्वार्थी आणि बेईमान लोक सोडून जातात म्हणजे पक्ष संपला असे नाही. बेईमान लोकं कधी कोणत्या पक्षाचे नसतात. जे शिवसेनेचे झाले नाहीत. ज्यांची शिवसेना आई होती, ते इतरांचे काय होणार असेही राऊत म्हणाले. पण 2024 ला आमची सत्ता येईल तेव्हा या सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशारा राऊतांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या:
Sanjay Raut : राहुल शेवाळेंचे आरोप पोरकटपणाचे, औटघटकेच सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्यानं पडणार, संजय राऊतांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
