एक्स्प्लोर

नवनीत राणा यांना आवरा अथवा महायुतीतून बाहेर काढा; एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा थेट इशारा, म्हणाले...  

Maharashtra Politics : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी देखील अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

Maharashtra Politics अमरावतीराज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आता अमरावती मतदारसंघात महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी आणखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.  शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार  आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी नुकतीच महायुतीतील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली  आहे. सोबतच त्यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावरही निशाणा साधला. त्या पाठोपाठ आता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांनीदेखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.

राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा- अभिजीत अडसूळ

माजी खासदार नवनीत राणा यांना आवरा अथवा महायुतीतून बाहेर काढा, किंबहुना आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला भाग पाडू नका. असा थेट इशारा अभिजित अडसूळ यांनी महायुतीतील उच्चपदस्थ नेत्यांना दिला आहे. राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात घ्या. असेही अभिजित अडसूळ म्हणाले.

शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही- अभिजीत अडसूळ 

पुढे बोलताना अभिजित अडसूळ म्हणाले की, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतलीय, तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ यांना का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ  यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी नुकतीच बोलताना व्यक्त केली होती. भाजपने दिलेला शब्द पाळायला हवा. आम्ही राज्यपाल पदासाठी आजही थांबायला तयार आहोत. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अभिजीत अडसूळ यांनी बोलून दाखवली.

राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं- अभिजीत अडसूळ

आमदार रवी राणा हे कायम वाचाळपणे बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबध नाही. महायुतीत खडा टाकण्याचं काम रवी राणा करत आहेत. शिवसनेच्या नेत्याबाबत आर्वाच्च भाषेत बोलणं योग्य नाही. खोटी प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वास घात केलाय. त्यामुळे जनतेनेही त्यांना जागा दाखवली. तर आनंदराव अडसूळ हे महायुतीचे नेते आहेत. आमच्या नेत्याबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर युतीत रहायचं की नाही, हाही विचार आता आम्हाला करावा लागेल. 

रवी राणांमुळेच बच्चू कडू महायुतीतून दूर गेलेत

राणांचा इतिहास पहा.सत्तेत जो पक्ष असतो त्या पक्षाचे नेते यांचे देव असतात. बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा. ब्लॅकमेलिंग करणं हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकावलंय. मात्र, आमच्या नेत्याबद्दल बोलवून आमचा स्वाभिमान दुखावला जात असेल तर नक्कीच याचा विचार केला जाईल. महायुतीतील नेत्यांवर छपरी आमदार अपमानकारक बोलत असतील तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल. असेही अभिजीत अडसूळ म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget