एक्स्प्लोर
सिंधुदुर्गात शिवसेना उमेदवाराच्या भाच्याचं अपहरणनाट्य
सिंधुदुर्ग : सिंधुदु्र्गातील राजकीय वातावरण अपहरणनाट्याने चांगलंच तापलं आहे. शिवसेना उमेदवार स्नेहा मिलींद दळवी यांच्या भाच्याचं अपहरण आणि सुटका झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधल्या वेताळबांबर्डेत पंचायत समिती मतदार संघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
शनिवारी रात्री दोघांनी स्नेहा यांचा भाचा अक्षय दीपक निवळेचं अपहरण केलं. सावंतवाडीचा रहिवासी असलेला अक्षय शुक्रवारी आपल्या मावशीच्या प्रचारासाठी वेताळबांबर्डेत आला होता. स्नेहा दळवी निवजेत प्रचाराला गेले असताना अपहरणाची घटना घडली.
दोघा अज्ञात व्यक्तींनी स्नेहा दळवी यांच्या घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. अक्षयने पाणी आणून दिल्यावर तेच पाणी त्याच्या तोंडावर मारलं आणि मिर्ची पूड मारुन त्याचं अपहरण केलं. अक्षयला घराशेजारच्या जंगलात झाडाला बांधून ठेवण्यात आलं.
स्नेहा दळवींना अक्षयच्या फोनवरुन कॉल करुन अक्षयच्या रडण्याचा ऐकवला. आवाज ऐकवून दोघंही अपहरणकर्ते पसार झाले. दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घरी धाव घेत शोधाशोध केली असता अक्षय शेजारच्या जंगलात हात, पाय, तोंड बांधलेल्या अवस्थेत झाडाला बांधलेला आढळला.
निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडणं म्हणजे राजकीय स्टंट आहे, विरोधीपक्षांनी केलेली खेळी की मतांसाठी केलेला बनाव, याचा तपास पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement