एक्स्प्लोर
ठाण्यात शिवसेना-भाजपकडून स्वबळाची तयारी सुरु
ठाणे : मुंबईत युतीची चिन्हे नसताना ठाण्यात देखील युती जवळपास तुटल्याची चिन्हे आहेत. कारण दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे.
मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिका निवडणूक देखील सर्वपक्षीयांसाठी महत्वाची आहे. त्यासाठी युती आणि आघाडीच्या बोलणी सुरु आहे. आघाडी तर जवळपास निश्चित झाली असली, तरी युती मात्र अजूनही होत नाही. कारण युतीचे घोडे मुंबईमधून पळवले जातात. हे सुरु असतानाच दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरु केली आहे.
ठाणे हा शिवसेनेचा पूर्वीपासून बाले किल्ला मानला जातो. मात्र शिवसेनेला सर्वात मोठी टक्कर मित्रपक्ष भाजपकडून मिळेल, असे समजते. कारण शिवसेने प्रमाणे भाजपने देखील सर्व जागांची तयारी केली आहे आणि शिवसेनेवर टीका देखील सुरु केली आहे.
एकमेकांवर टीका करणे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण करत शिवसेना आणि भाजप ठाण्यात एक नंबरचा पक्ष बनण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, अशात युती झालीच तर याचा फटका दोन्ही पक्षांना तितकाच बसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement