एक्स्प्लोर

MLA Disqualification Case : ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर ठरले पात्र! राहुल नार्वेकरांच्या निर्णायाकडे होतं राज्याचं लक्ष

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर केला गेला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

MLA Disqualification Case : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाला. संपूर्ण राज्याचं या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. नार्वेकर यांच्या निकालाकडे रमेश कोरगावकर (Ramesh Korgaonkar) यांचेही लक्ष लागले होते. कारण, ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या यादीत रमेश कोरगावकर यांचे देखील नाव आहे. रमेश कोरगावकर हे पात्र ठरले आहेत. 

रमेश कोरगावकर यांचा राजकीय परिचय - 

रमेश कोरगावकर हे भांडूप पश्चिप विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. कार्यकर्ता, नगरसेवक आणि आमदार असा प्रवास त्यांचा राजकीय प्रवास आहे. रमेश कोरगावकर हे 2002 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये  (BMC)  नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये आणि 2012 मध्ये देखील ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2012 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नागरी बांधकाम (उपनगरे) समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. 2019 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.

पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना समर्थन देण्याचा निर्णय घेतला

पक्ष फुटीनंतर रमेश कोरगावकर यांना उद्धव ठाकरेंना समर्थन दिले. सुनील प्रभूंच्या व्हिपचं रमेश कोरगावकर यांनी पालन केलं. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत, अशी भूमिका रमेश कोरगावकर यांनी घेतली.  

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.  जवळपास दोन वर्षानंतर राज्यातील हे महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. त्याला एकनाथ शिंदेंचा बंड हे कारण ठरले. एकनाथ शिंदे यांनी महाविकासआघाडीच्या विरोधात बंड पुकारलं. ते काही आमदारांना घेऊन सूरतमार्गे गुवाहाटीमध्ये पोहचले. एकाचवेळी 40 आमदारांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेयांच्यासह 16 आमदारांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या 14 आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर पडदा उठणार आहे. यामधील ठाकरे गटाच्या  14 आमदारांच्या यादीत रमेश कोरगावकर यांचे देखील नाव आहे. आता रमेश कोरगावकर यांची आमदारकी पात्र ठरणार की अपात्र ठरणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. अखेर ते पात्र ठरले आहेत.

आणखी वाचा :

MLA Disqualification Case : वैभव नाईक पात्र की अपात्र? राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget