एक्स्प्लोर

‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना कोल्हापुरातच रोखलं!

कोल्हापूर: बेळगावात ‘जय महाराष्ट्र’विरोधी फतव्याच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं मोर्चा काढला. मात्र, त्याआधी मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना बेळगावच्या हद्दीत अडवण्यात आलं आहे. बेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र्-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर रावतेंचा ताफा कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानंतर आता ते पुन्हा कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्रविरोधी फतवा काढल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे. तसेच सीमा भागातील मराठी बांधवही आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या कारणामुळे बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रवेशबंदीचा फतवा काढला आहे. 24 ते 27 मे या काळात ही प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? कर्नाटकात बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी सुरु आहे. लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिली होती. आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द करणार, असा नवीन कायदा कर्नाटक सरकार अंमलात आणणार आहे. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचंही रोशन बेग यांनी स्पष्ट केलं होतं. एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरु असताना, एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींची अशीही गळचेपी होणार आहे. त्यामुळे आता मराठी प्रेम तसंच महाराष्ट्र प्रेम दाखवणं लोकप्रतिनिधींच्या अंगलट येणार आहे.   शिवसेना-मनसेचं चोख उत्तर कर्नाटकच्या नगर विकासमंत्री रोशन बेग यांना शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या कर्नाटक राज्याच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्या बस कर्नाटकात परत पाठवल्या आहेत. जय महाराष्ट्रचे स्टिकर कर्नाटक परिवहनच्या बसवर लावल्यानं पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. संबंधित बातम्या: कर्नाटक मंत्र्याविरोधात बेळगावात मराठीजनांचा मोर्चा कर्नाटकात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम  शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स  ‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Naresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषणRaj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
Embed widget