(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिर्डी-जयपूर विमानसेवेला प्रारंभ
1 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे उद्घाटन झाले होते. सुरुवातीला मुंबई आणि हैद्राबाद येथून विमानसेवा सुरु झाली. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीतूनही विमान सेवा सुरु झाली होती. हैद्राबादहून 3, मुंबईतून दोन तर दिल्लीहून 2 विमानं सध्या दररोज सुरु आहेत.
शिर्डी : नवीन वर्षात जयपूर-शिर्डी विमानसेवेला आजपासून प्रारंभ झाला आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या विमानतळावरुन आता आणखी पाच शहरांतून विमानसेवा सुरु होणार आहे. येत्या दहा जानेवारीपासून स्पाईस जेटला ही विमानसेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे.
1 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे उद्घाटन झाले होते. सुरुवातीला मुंबई आणि हैद्राबाद येथून विमानसेवा सुरु झाली. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीतूनही विमान सेवा सुरु झाली होती. हैद्राबादहून 3, मुंबईतून दोन तर दिल्लीहून 2 विमानं सध्या दररोज सुरु आहेत.
आजपासून स्पाईस जेटने जयपूर विमानसेवा सुरु केली आहे. येत्या 10 जानेवारीपासून बंगळुरु-शिर्डी-मुंबई, अहमदाबाद-शिर्डी, भोपाळ-शिर्डी आणि चेन्नई-शिर्डी या सहा शहरातून विमानसेवेला सुरुवात होणार आहे. नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेसोबतच हैदराबादसाठी विमानाच्या आणखी फेऱ्या वाढणार आहेत.
स्पाईस जेटला विमान प्रधिकरणाने काही दिवसांपूर्वी विमानसेवेची परवानगी दिली होती. आणखी काही विमान कंपन्यांनाही देशातील काही शहरातून शिर्डीसाठी विमानसेवेची परवानगी देण्यात आलेली आहे. आता लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरु होणार असल्याने रात्रीही शिर्डीसाठी विमानसेवेला सुरुवात होणार आहे.