एक्स्प्लोर

झंझावाती शरद पवार! 10 दिवसांत घेणार 36 सभा; शेवटच्या सभेसाठी निवडलं खास ठिकाण; अजितदादांपुढं मोठं आव्हान!

शरद पवार यांच्या आगामी काळात साधारण 36 सभा होणार आहेत. शरद पवार एका दिवसात सरासरी 4 सभा घेत आहेत. त्यांनी त्यांच्या शेवटच्या सभेसाठी खास ठिकाण निवडलं आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील प्रमुख नेते एका दिवशी चार-चार सभांना संबोधित करत आहेत. काही नेतेमंडळींच्या पुढच्या सभांचे नियोजनही आतापासूनच चालू आहे. आगामी काही काळात या नेतेमंडळीचां कार्यक्रम निश्चित झालेला आहे. यामध्ये खासदार शरद पवार हेदेखील मागे राहिलेले नाहीत. शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या शेवटच्या सभेचं ठिकाणही विशेष असणार आहे. 
शरद पवार 10 दिवसांत घेणार 36 सभा 
आगामी काळात शरद पवार पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. ते पुढच्या दहा दिवसांत म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 36 सभांना संबोधित करणार आहेत. यामध्ये उत्तर कराड, तासगाव कवठे महांकाळ,  इंदापूर, कर्जत जामखेड अशा महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. या सभांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. 
6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत शरद पवारांच्या एकूण 50 सभांचे आयोजन होणार आहे.

शरद पवार आज (नोव्हेंबर) उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत.

10 ऑक्टोबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी

11 ऑक्टोबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण

12 ऑक्टोबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव

13 ऑक्टोबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी

14 ऑक्टोबर- चिंचवड/पिंपरी रॅली

15 ऑक्टोबर- तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर

16 ऑक्टोबर- वाई, कोरेगाव, माण, फलटण

17 ऑक्टोबर- करमाळा, माढा, कर्जत जामखेड

18 ऑक्टोबर- भोर, दौंड, इंदापूर, बारामती
शेवटची सभा बारामतीमध्ये
शरद पवार यांची शेवटची सभा 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे ही शेवटची सभा बारामती या मतदारसंघात होणार आहे. या मतदारंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार आणि खुद्द अजित पवार यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे शेवटच्या सभेसाठी शरद पवार यांनी बारामती हा मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे अजित पवार यांचं टेन्शन वाढणार आहे.  

हेही वाचा :

...तर म्हणतील ताजमहाल मीच बांधला, देवेंद्र फडणवीसांची नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका!

BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?

हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget