एक्स्प्लोर

आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, शरद पवारांची प्रतिक्रिया; लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करा, उदयनराजेंची मागणी

Jalna Protest : शरद पवार आणि उदयनराजे भोसले एकाचवेळी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते.

Jalna Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान आज सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी आणि जखमी गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी जालना दौऱ्यावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) एकाचवेळी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी काल नेमकं काय घडलं याबाबत माहिती जाणून घेतली. तर, लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करण्याची उदयनराजेंची यांनी मागणी केली असून, बळाचा वापर करण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, कालची घटना पाहून मी इथे आलोय. शांततेच्या मार्गाने आंदोलन असावं. कालची घटना दुर्देवी आहे. सरकारने दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही. पोलीस या ठिकाणी आणले गेले.  लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला आहे. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली आणि दुसरीकडे लाठी हल्ला केलाय. तर यात संबध नसलेल्या लोकांवर लाठीचार्ज केलाय. मी हॉस्पीटला गेलो तेव्हा काही लोकांना छर्रे लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनात बळाचा वापर नको करायला होता. शब्द न पाळल्यानं आंदोलन सुरु झालं. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही. हवेत गोळीबार करण्यात आले. इथलं उपोषण स्वताच्या फायद्यासाठी नव्हतच.  मोठ्या संख्येने पोलीस आणले गेले होते.  तर याठिकाणी बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 

दरम्यान याचवेळी व्यासपीठावर असलेले उदयनराजे बोलतांना म्हणाले की, ज्यांनी हा प्रकार केला त्यांना निलंबित करण्यात यावे. जखमीच्या उपचार खर्च शासनाने करावा. आरक्षणच्या मागणीसाठी न्यायिक प्रकिया तात्काळ सुरु करावी. आरक्षणाचा मुद्दा हा फार वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं का झालं नाही माहीत नाही. मी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. तसेच त्यांची आंदोलनकर्ते आणि इतरांची भेट घालून देऊ. आतापर्यंत 57 महामोर्चा काढले त्यावेळी कुठला अनुचित प्रकार झाला नाह. मोठा समाज आहे त्याकडे दुर्लक्ष केले. शरद पवार, जयंत पाटील सगळ्यांनी एकत्र येवून तोडगा काढावा. गायकवाड कमिशन मधील त्रुटी दूर कराव्यात. क्यूरुटीन पिटीशन दाखल केले आहे, त्यात मदत होईल असं करावं. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर या सारखं दुर्दैव नाही. ज्यांनी हे लाठीचार्जचे आदेश दिले, त्यांचा मी त्रिव निषेध करतो. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करतो. जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यात यावेत. ज्या मागण्या मनोज यांनी दिल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे उदयनराजे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

कुठे चारचाकी पेटवली तर कुठे आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढले; औरंगाबादेत जालन्यातील घटनेचे पडसाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Embed widget