एक्स्प्लोर

कचऱ्याच्या ढिगाऱ्याला कंटाळून महानोरांनी राहतं घर सोडलं!

जळगाव शहरातील खुल्या भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा भूखंडाच्या अस्वच्छतेमुळे शहरात दुर्गंधी आणि चिकनगुन्या,डेंग्यू, मलेरिया यांसारखे विविध आजार पसरले आहेत. याचाच फटका जेष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना देखील बसला आहे.

जळगाव : ज्या माणसानं महाराष्ट्राला अजरामर कविता दिल्या, ज्या माणसानं माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, त्याच माणसाला आज आपलं घर सोडावं लागलं आहे. घरासमोरच्या रिकाम्या भूखंडावरचा कचरा न हटवल्यानं उद्विग्न झालेल्या रानकवी ना. धों. महानोर यांनी जळगावमधल्या आपल्या राहत्या घराला टाळं लावून, भाड्याच्या खोलीमध्ये आसरा घेतला आहे. वारंवार तक्रारी करुनही प्रशासनानं दखल घेतली नाही. त्यामुळे महानोर यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही, तर दुसरीकडे पळसखेडमधल्या शेतातल्या घरातली वीजही गेल्या 5 दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे महानोर यांनी आता भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. जळगाव शहरातील खुल्या भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा भूखंडाच्या अस्वच्छतेमुळे शहरात दुर्गंधी आणि चिकनगुन्या,डेंग्यू, मलेरिया यांसारखे विविध आजार पसरले आहेत. याचाच फटका जेष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना देखील बसला आहे. ना. धों. महानोर यांचं घर जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या आदर्श नगर परिसरात आहे. निसर्गकवी असल्याने त्यांनी आपल्या घराचे नाव देखील ‘पानकळा’ असे ठेवले आहे. मात्र त्यांच्या घरासमोरच असलेल्या भूखंडावर परिसरातील नागरिक घाण आणि कचरा आणून टाकत असल्याने त्याची दुर्गंधी आणि कचरा यांमुळे त्यांच्या घराला अवकळा निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून विविध तक्रारी करुनसुद्धा तात्पुरता फरक सोडला तर स्वच्छतेच्या बाबतीत पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी वेळ त्यांच्यावर आल्याने त्यांनी आपल्या स्वतःच्या घराला टाळे ठोकून दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहायला जाणे पसंत केले आहे. त्यांच्या या निर्णयाने जळगाव शहरातील स्वच्छता मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार आहे. या काळात कधी झाली नसेल अशी स्वछता मोहीम त्यांनी राबवून स्वच्छतेच्या बाबतीत जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण केले आहे. महानोरांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या घरासमोर कचरा टाकणाऱ्या काही जणांवर त्यांनी कारवाई करीत नोटीस देखील बजावली होती. मात्र त्याचाही म्हणावा तसा परिणाम न झाल्याने महानोर यांनी या समस्येतून आपली सुटका नाही या हतबलतेतून आपले घरच बदलणे पसंत केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget