एक्स्प्लोर

IPS अधिकारी संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

साईड पोस्टिंगमुळे आयपीएस अधिकारी संजय पांडे नाराज होते. परंतु महाराष्ट्र सरकारने संजय पांडे यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत हा कार्यभार अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे होता. साईड पोस्टिंगमुळे संजय पांडे नाराज होते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठकही झाली होती. तसंच संजय पांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. अखेर महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (9 एप्रिल) आदेश मंजूर करत राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे सोपवला. अतिशय शिस्तप्रिय, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी संजय पांडे यांची ओळख आहे.


IPS अधिकारी संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

- आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण

- 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी

- सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात

- मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले

- 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना

- 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे 
 
- मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला

- 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.

- 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला
 
- 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.

- 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

- 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते

- 2001 मध्ये  राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.

- 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.

- कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.

- 2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.

- 2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.

- अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.

- 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget