एक्स्प्लोर

चालत्या गाडीची अचानक लाईट बंद झाली अन् गाडी थेट विहिरीत

चालत्या गाडीची अचानक लाईट बंद पडल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या 50 फूट विहिरीत जाऊन पडल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. या भयंकर अपघातातून तिघेजण सहीसलामत बाहेर आलेत.

बीड : कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला असा वाक्यप्रचार आपण नेहमी बोलताना वापरतो. अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. रस्त्यावरुन सुसाट जाणाऱ्या गाडीची लाईट अचानक बंद पडते आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडते. दैव बलवत्तर म्हणून या भयंकर अपघातातून तिघेजण सहीसलामत बाहेर आलेत.

ही घटना आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव या फाट्यावरती अमरापूर-बारामती या रोडवरुन जाताना रात्री नऊच्या सुमारास घडली. या रस्त्याचे नव्याने चौपदरीकरण झाले आहे, त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढली आणि रस्त्याच्या कडेला असलेली विहीर ही झाडांनी वेढली गेली असल्याने ती अशी फारशी लक्षात येत नाही.

शिक्षणाचा नवा "बीड पॅटर्न", दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण

करण राजू पवार, नितीन अशोक गुंड, बालू शहादेव गुंड आष्टी तालुक्यातील वाघळुज या ठिकाणचे राहणारे आहेत. हे तिघेजण जालन्याला एका लग्नासाठी गेले होते. लग्न होऊन गावी परत येत असताना रात्री नऊ ते साडेनऊची वेळ होती. या देवीनिमगाव फाट्याजवळ गाडी आल्यानंतर अचानक गाडीची लाईट बंद झाली. त्यामुळे चालकाचा गाडीवरचा नियंत्रण सुटलं आणि क्षणार्धात गाडी थेट विहिरीत जाऊन पडली.

स्कार्पिओ गाडी जावळी या विहिरीत पडली. त्यावेळी सगळा काळोख पसरलेला होता. त्यामुळे नेमकं काय झालं हेच या तिघांच्या लक्षात आलं नाही. पण गाडी ज्या वेळी या विहिरीच्या पाण्यामध्ये बुडत होती. त्यावेळी मात्र तिघांनीही बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. नेमके याच वेळी देवीनिमगाव येथील शिक्षक सचिन मार्कंडे व महाराज फाळके हे दोघे गावाकडे जात असताना त्यांनी हा अपघात पाहताच जखमींना तात्काळ या विहीरीतून बाहेर काढले. दैव बलवत्तर होतं म्हणून एवढ्या विचित्र अपघातानंतर सुद्धा या तिघांनाही फारसा काही मार लागला नाही. जवळच्याच कड्याच्या आरोग्य केंद्रामध्ये त्याच्यावरती उपचार चालू आहेत. आज दुपारी या विहिरीमधून ट्रेन लावून ही गाडी बाहेर काढण्यात आली आहे.

बीडमध्ये स्वत: लावलेल्या आगीतच डॉक्टरचा होरपळून मृत्यू, पैशाच्या कमिशनवरून मेडिकल चालकासोबत वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget