एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2026 : अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार ते महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget 2026: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्या जाणून घेऊयात.... 

1. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. ⁠महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे. 

2. अजित दादा पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

3. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.  ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली.  २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून २३ हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे.  मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

4. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे. 

5. राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.  प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार,  बांबू विकास प्रकल्प वाढवणार,  परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास आले आहे. 

6. मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु,  पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे.  जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

7. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.  

8. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

9. कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

10. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आणखी वाचा 

Maharashtra Budget 2026, Devendra Fadnavis: मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो, 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग; देवेंद्र फडणवीसांनी मुंबईसाठी कोणकोणत्या घोषणा केल्या?, A टू Z माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates Today:मध्यपूर्वेतील शांततेचा परिणाम की वादळापूर्वीची शांतता? सोने-चांदीचे दर घसरले; आजचा भाव किती? ही 5 कारणे 
मध्यपूर्वेतील शांततेचा परिणाम की वादळापूर्वीची शांतता? सोने-चांदीचे दर घसरले; आजचा भाव किती? ही 5 कारणे 
LPG Gas subsidy Ujjwala Scheme: घरगुती एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली
एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली
JSW Energy : जेएसडब्ल्यू एनर्जीचा मोठा धमाका! गुजरातमध्ये पवन ब्लेड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन; 30 गिगावॉट क्षमतेचे उद्दिष्ट
जेएसडब्ल्यू एनर्जीचा मोठा धमाका! गुजरातमध्ये पवन ब्लेड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन; 30 गिगावॉट क्षमतेचे उद्दिष्ट
Equitas Bank : 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' बँकेच्या शेअरमध्ये 'कप आणि हँडल' ब्रेकआउट; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' बँकेच्या शेअरमध्ये 'कप आणि हँडल' ब्रेकआउट; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
Embed widget