एक्स्प्लोर

...तर दहावीचा निकाल 31 जुलै आधीच जाहीर होणार

लॉकडाऊनमुळे दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडले होते. मात्र बारावीच्या निकालाची याता प्रतीक्षा संपली आहे. आता दहावीचे विद्यार्थी आणि पालकही निकालाची वाट पाहत आहे.

मुंबई : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल यंदा जवळापास एक-दीड महिना उशीरा लागणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. दहावी, बारावीच्या निकालाबाबत 10 जुलै रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावी निकाल 15 जुलै ते 20 जुलैदरम्यान लागला आहे. म्हणजेच दहावीचा निकालही 31 जुलैच्या आधीच जाहीर होणार आहे. लॉकडाऊनमुळे दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडले होते. मात्र बारावीच्या निकालाची याता प्रतीक्षा संपली आहे. आता दहावीचे विद्यार्थी आणि पालकही निकालाची वाट पाहत आहे.

MAH HSC Result 2020 | अखेर प्रतीक्षा संपली, उद्या बारावीचा निकाल

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

http://mahresult.nic.in/

यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

MAH HSC Result 2020 | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणपडताळणी अर्ज होणार ऑनलाईन

दरवर्षी निकाल लागल्यावर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीचे अर्ज देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत: मंडळात जावं लागत होतं किंवा शाळा, महाविद्यालयांच्या मार्फत मंडळात अर्ज द्यावे लागत होते. मंडळात अर्ज देणं गरजेचं होते. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा, महाविद्यालयं आणि विभागीय मंडळामध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ही आॅनलाईन प्रक्रिया सुरु होईल.

दहावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in

बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in

या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

VIDEO- बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत : वर्षा गायकवाड
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर
सोने चांदीची दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट, चांदीकडून सव्वा दोन लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या नवे दर
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
Embed widget