इंग्रजीच्या भीतीनं साताऱ्यात विद्यार्थीनीची आत्महत्या तर कोल्हापुरात शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात काल एकाच दिवशी दोन विद्यार्थीनींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सेमी इंग्लिश नको म्हणून साताऱ्यातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. नववीत शिकणाऱ्या अनुष्का पवार हीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही पालकवर्ग, शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये तिने म्हटलं आहे.
शहरी भागात पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढू लागलाय. तेच लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय. मात्र आता सेमी इंग्लिश नको म्हणत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कराड मलकापुरातील पायल लेंढे ही इयत्ता 9 वीमध्ये शिकत होती. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर सातारा शहरातील धुमाळ आळी येथे राहणारी 15 वर्षाची अनुष्का पवार हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 9 वी मध्ये शिकत होती. या दोन विद्यार्थीनींनी केलेल्या आत्महात्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीनं आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा येथील ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित अमित कुंभार या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणीने हे पाऊल उचललं असं बोललं जात आहे. आकांक्षा सातवेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
- Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...
- धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha