एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल, तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती : संजय राऊत
उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महाराष्ट्राला लवकर कळेल पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे राऊत म्हणाले. सगळेजण आमचे मित्र आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्रात परिवर्तन हवं आहे. म्हणून असे निकाल लागले आहेत, असे देखील राऊत म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल आणि तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हातात आहे असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत राऊत बोलत होते. विविध आमदार शिवसेनेला समर्थन देत आहेत असंही राऊतांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची ताकद नक्कीच वाढली असल्याचंही राऊतांनी सांगितलं. निवडणुकीच्या निकालानंतर मातोश्रीवर धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवलेल्या बाळासाहेब सानप यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
राऊत म्हणाले की, शिवसेनेची ताकद अजून वाढणार आहे. काल ३ आमदारांनी पाठिंबा दिला आहे शिवसेनाला भविष्यात जास्त समर्थन मिळेल. लवकरच काही लोक मातोश्रीवर दिसतील, असेही ते म्हणाले. शिवसेनेला कोणतीही अडचण नाही, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महाराष्ट्राला लवकर कळेल पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे राऊत म्हणाले. सगळेजण आमचे मित्र आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्रात परिवर्तन हवं आहे. म्हणून असे निकाल लागले आहेत, असे देखील राऊत म्हणाले.
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, एकूण बलाबल पाहता सत्तेचा रिमोट कन्ट्रोल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे संजय राऊत यांनी काल सामनाच्या एका लेखातून म्हटले होते. त्यानंतर आज ही भूमिका मांडल्याने चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊत यांनी आपल्या सदरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचेही कौतुक केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये कृषी, शिक्षण क्षेत्रात केलेलं काम अतिशय उल्लेखनीय असून प्रत्येक आमदाराने ते पहायला हवे असे सूचक विधानही त्यांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement