एक्स्प्लोर

Sangli : सांगली जिल्हा बँकेच्या ठरावावरून तुंबळ हाणामारी; आमदार पडळकरांची गाडी फोडली तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा पाय मोडला

आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गट आमने-सामने आला असून तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये पडळकरांची गाडी फोडली तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्या पाय मोडला.

सांगली : आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली आहे. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसन मारहाणीपर्यत गेले. या घटनेनंतर आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आटपाडी मध्ये पोलीसाची कुमक वाढवली गेलीय.

आमदार पडळकरांची गाडी आपल्या अंगावर घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केलाय. यात आणखी काहीजण जखमी आहेत. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडलीय. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक लागली आहे. भाजपकडून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज भरले आहेत. या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मानेवाडी सोसायटी मार्फत सर्वानुमते दादासाहेब बरकडे यांना मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव झाला आहे. भाजप गटाकडे कल असलेल्या बरकडे यांनी शिवसेनेच्या तानाजी पाटील यांना समर्थन दिले आहे.

या मुद्यावरून भाजपच्या समर्थकांची बरकडे यांच्या नातलगांशी बाचाबाची झाली. पुन्हा या विषयावरून दुपारी पडळकर व राष्ट्रवादीचे राजू जानकर यांच्यात फोनवरून वादावादी झाली. दरम्यान, मतदार पळवापळवीच्या शक्यतेने सेना व राष्ट्रवादीचे समर्थक साठेनगर चौकात जमले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील देखील यावेळी उपस्थित होते. निंबवडे रस्त्यावरून आमदार पडळकर हे चालक गणेश भुते यांच्यासोबत एका गाडीत आणि ब्रम्हानंद पडळकर दुसऱ्या गाडीत होते. साठे चौकात या गाड्यांवर सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीने बाळू मोटे यांना उडवले. तर आमदार पडळकर यांची गाडी दिघंचीच्या दिशेने गेली आणि माघारी परततांना त्यांच्या गाडीने मोटारसायकलला ठोकर देत राजू जानकर यांना ठोकरले. या घटनेत सुदैवाने सपोनि पाटील थोडक्यात बचावले. परंतु राजू जानकर यांचा पाय मोडला तर बाळू मोटे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे आटपाडी शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांच्या उपस्थितीत साठे चौकात काठ्या घेऊन सुमारे 200 कार्यकर्ते आणि साई मंदिर चौकात पडळकर समर्थक सुमारे 200 कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवल्याने थोडा तणाव कमी झाला. परंतु या घटनेचे पुन्हा पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Vinod Patil : विनोद पाटील महायुतीचा प्रचार करणार? भेटीत काय ठरलं?Mallikarjun Kharge : कलबुर्गीतील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचं भावनिक आवाहनLokesh Sharma : पेनड्राईव्ह दाखवत लोकेश शर्मा यांचे गेहलोतांवर गंभीर आरोपAjit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
Embed widget