Sambhaji Bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले, हिंदू समाजाला xxडू बनवत आहेत : संभाजी भिडे
नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या आहेत.
सांगली : शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला, पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला XXडू बनवत चालला आहे. हे सर्व चालणार नाही, नवरात्रीचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही. काही माता-भगिनींनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी संभाजी भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या आहेत. नवरात्र उत्सवात करमणूक सुरु असून हे सर्व नाश करत चालले आहे. हातात काठी घेऊन येणाऱ्या पोलिस गुरख्यांना सांगतो की हे सर्व तातडीने बंद करा.
नारीशक्तीच्या उत्सवात नारीलाच नाकारण्यापर्यंत संभाजी भिडेंची मजल; दुर्गादेवी दौडमध्ये महिलांना नाकारले, म्हणाले बट्ट्याबोळ... https://t.co/T2wRtgQujo #Navratri #sambhajibhide
— ABP माझा (@abpmajhatv) October 3, 2024
महामूर्ख जमात म्हणजे हिंदू
आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केली.हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू आहे. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपल्याला भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे भिडे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या