एक्स्प्लोर
तुम्ही वांग्याचं भूत केलं, तुमचं तोंड बघायचं नाहीय : संभाजी भिडे
“मी भित्रा नाहीय, ही मोगलाई आहे का? मी पुढल्या सीटवरच बसेन.”
चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूणमध्ये बैठकीसाठी आलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी माध्यमांवर आगपाखड केली. चिपळुणात भिडेंच्या सभेला झालेल्या तीव्र विरोधावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी, “गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात”, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
“तुम्ही बेकार आहात. गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन, विषय चघळत ठेवलात. मला तुमचं तोंड बघायचं नाही.” असे संभाजी भिडे माध्यमांना उद्देशून म्हणाले.
चिपळुणात भिडेंच्या सभेला तीव्र विरोध
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना काल चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान मोठा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र अशा परिस्थितीत संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक जवळपास तीन तास चालली.
गाडीत मागच्या सीटवर बसण्यास भिडेंचा नकार
बैठक संपल्यानंतर संभाजी भिडेंना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात तेथून बाहेर काढले. भिडे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना इनोव्हा गाडीत मागे बसण्याची विनंती केली. मात्र, मी पुढच्या सीटवर बसणार, असा आग्रह धरला. अखेर पोलिसांनाही त्यांचं ऐकावं लागलं आणि त्यांना पुढल्या सीटवर बसण्यास सांगितले गेले.
यावेळी भिडे म्हणाले, म्हणाले, “मी भित्रा नाहीय, ही मोगलाई आहे का? मी पुढल्या सीटवरच बसेन.”
याच काळात दोन्ही मार्गावरील जमाव आक्रमक झाल्यामुळे संभाजी भिडेना जवळजवळ अर्धा तास गाडीत प्रतीक्षा करावी लागली. अखेर रत्नागिरी पोलिसांनी मार्ग मोकळा केला आणि रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे सभागृहातून मार्गस्थ होऊ शकले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement