
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule On Rss : RSS मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडलं आहे; सुप्रिया सुळे यांची जहरी टीका
समाजात अंतर आम्ही पाडले नाही मात्र आरएसएस मार्गदर्शक असलेला भाजपने समाजात अंतर पाडले आहे, अशी जहरी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule On Rss : आरएसएस मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडत आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) मार्गदर्शक म्हणून आरएसएसला (Rss) ओळखले जाते. त्यांना महागाई वाढली आहे हे मान्य करायचं नाही आहे, त्या सगळ्यांनी यासंदर्भात झोपेचं सोंग घेतलं आहे. महागाईवर बोललो तर समाजात अंतर पडायला लागते असं म्हटलं जातं. मात्र समाजात अंतर आम्ही पाडले नाही, आरएसएस मार्गदर्शक असलेला भाजपने समाजात अंतर पाडले आहे, अशीही टीका त्यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघात त्यांचा दौरा सुरू होता. या दौऱ्यामध्ये शिरसुफळ गावात असलेल्या शिरसाई मंदिरात जाऊन सुप्रिया सुळे यांनी शिरसाई देवीचे दर्शन घेतले. नवरात्र उत्सव सुरू असल्याने सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेऊन मंदिरात आरती केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.
आरएसएसचे जे जेष्ठ नेते आहे त्यांनी महागाईवर भाष्य केले आहे. मी त्यांचे स्वागत करते. काही गोष्टी वास्तवतेच्या आणि देशाच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मी अनेक वर्ष महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक स्थितीबाबत बोलते आहे. यात कोणतेही राजकारण न आणता आज आरएसएसने जो मुद्दा मांडला त्याचं मी स्वागत करते. हा मुद्दा देशासाठी महत्त्वाचा आहे. सरकारने गंभीर होणे गरजेचे आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'पालकमंत्रीच जिल्ह्याचे नाहीत'
शिंदे- फडणवीसांनी सत्ता ओरबाडून घेतली आहे. सत्तेत आलेल्यांना जनतेची सेवा करायची नाही. पालकमंत्रीदेखील आपल्या जिल्ह्याचे नाहीत. मात्र सगळं असलं तरीही विकासकामे झाली पाहिजे, असंही म्हणत त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
'लवकरात लवकर निवडणूक घ्या'
अनेक दिवसांची आमची मागणी आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका यांची निवडणूक लवकर झाली पाहिजे. नागरिकांना अडचणी येत आहेत. सत्तेचे विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घ्या, अशी विनंती त्यांनी केली आहे.
'भाजपात आल्याने चांगली झोप लागते'
संजय राऊत यांच्या प्रकरणात काहीतरी कुठं तरी शिजते आहे. एक बातमी आली होती. देशात 90 टक्के पेक्षा जास्त केसेस या विरोधकांच्या आहेत. जे विरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाईमध्ये वाढ झाली आहे. परंतु जे भारतीय जनता पार्टीत आलेत तेच बोलतात आम्ही भाजपमध्ये आलो आता आम्हाला शांत झोप लागते, असा टोलीही त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
