एक्स्प्लोर
राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ मनोरंजन समजा : भागवत
नागपूर : "राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. त्या मनोरंजन बातम्या वाचा आणि सोडून द्या," असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
राष्ट्रपतीपदासाठी आपल्या नावाची चर्चा केवळ माध्यमांमध्येच रंगत आहे. पण, प्रत्यक्षात राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला, तरी आपण ते पद स्वीकारणार नसल्याचं सरसंघचालकांनी स्पष्ट केलं.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येतानाच आपण राजकारणाचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे मीडियातील चर्चा या हवेत विरतील," असंही मोहन भागवत म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement