एक्स्प्लोर
आमदार होण्यासाठी ‘वर्षा’वरील नाही, राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद हवा- धनंजय मुंडे
बीडचा आमदार व्हायचं असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही, तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला.

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे 'वर्षा' बंगल्यावर गणपतीची आरती केली. याची चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बीडचा आमदार व्हायचं असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही, तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला.
विशेष म्हणजे राजुरी हे जयदत्त क्षीरसागर यांचं मूळ गाव आहे. राजुरीचा गणपती या परिसरात प्रसिद्ध आहे. राजुरी इथे गणपतीचे मंदिर असून ते जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणाला राजकीय महत्त्व देखील आहे.
आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना धनंजय मुंडे क्षीरसागरांचे नाव न घेता म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा 10 दिवस आशीर्वाद घेतला तरी त्यापेक्षा राजुरीचा आशीर्वाद महत्वाचा आहे."
बीड विधानसभा मतदार संघातली लढत संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर अशीच होण्याची दाट शक्यता आहे. चुलत्या-पुतण्यांच्या या लढाईमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवार 1 ऑक्टोबरला बीडला येणार
शरद पवार 1 ऑक्टोबरला बीडमध्ये सभा घेणार आहेत. त्याआधी म्हणजे 31 सप्टेंबरला शरद पवार संदीप क्षीरसागर यांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांची जाहीर भेट घेणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय? या संदर्भात शरद पवारांचे मत काय? याविषयी मात्र आता उत्सुकता निर्माण झाली आहे
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement



















