एक्स्प्लोर

पाच दिवसात राष्ट्रवादी का सोडली? रमेश कराड म्हणतात...

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि रमेश कराड यांनी ठरवून हा डाव खेळला, अशीही चर्चा रंगली. मात्र विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर रमेश कराड यांनी एबीपी माझाला राष्ट्रवादी सोडण्याचं कारण सांगितलं.

लातूर : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश कराड यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. कराडांची माघार ही महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणातली अभूतपूर्व घटना मानली गेली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि रमेश कराड यांनी ठरवून हा डाव खेळला, अशीही चर्चा रंगली. मात्र विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर रमेश कराड यांनी एबीपी माझाला राष्ट्रवादी सोडण्याचं कारण सांगितलं. ''राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उमेदवारी दिली. त्यांच्या आदेशानंतर फॉर्म भरला. पण ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक पैसे मागण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला,'' अशी माहिती रमेश कराड यांनी दिली. ''राजकीय कारकीर्द दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. पंकजांसोबतचं जे नातं आहे, ते रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळे मनाला वाटायला लागलं की कुठे तरी चुकलोय,'' असंही रमेश कराड म्हणाले. आता कोणत्या पक्षात? रमेश कराड यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते आता कोणत्या पक्षात आहेत, हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय होता. ''उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पंकजांची भेट घेतली. शिवाय भाजपातील नेत्यांशीही राजकारणाच्या पलिकडची मैत्री आहेच. योग्य व्यक्तीसोबत बोलणं झालं आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत भाजपात काम केलंय आणि भविष्यातही काम करणार'', असं रमेश कराड यांनी सांगितलं. दरम्यान, ''आपल्याकडच्या मतदारांसह इतर मतदारही भाजपसाठी जोडून दिले,'' असा दावाही रमेश कराड यांनी केला. ''राष्ट्रवादीतला अनुभव सर्वात वाईट'' ''राष्ट्रवादीचं अस्तित्व लातूर जिल्ह्यात नगण्य आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मी राष्ट्रवादीत आल्यामुळे खुश होते. पण कार्यकर्त्यांचा आनंद हा क्षणिक होता. कारण, राष्ट्रवादी पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी चालत नाही, नेत्यांसाठी चालतो. जे पैसे मागण्यात आले, ते देणं शक्य नव्हतं, माझे वडील आजही शेती करतात, ते काही कारखानदार नाहीत,'' असं म्हणत रमेश कराड यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केली. पाहा संपूर्ण मुलाखत

संबंधित बातम्या :

बीडचे राष्ट्रवादीचे नेतेच पक्ष संपवतील : पंकजा मुंडे

रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस

खरा दे धक्का 24 तारखेला कळेल, धनंजय मुंडेंचा इशारा

पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!

उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?

आता भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही : पंकजा मुंडे

विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Jain Muni Nileshchandra on Raj Thackeray: तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Embed widget