एक्स्प्लोर

आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव

रस्ता नाहीच, नदी-नाले-पूर ओलांडून आदिवासींच्या आरोग्यासाठी जेव्हा आरोग्य कर्मचारी-पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते गावात पोहोचले तेव्हा ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरले.

गडचिरोली : महाराष्ट्राच्या दुर्गम टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा आजही विकासापासून कोसो दूर आहे. अहेरी या मुख्यालयाच्या शहरापासून केवळ 35 किमी अंतरावर व्यंकटापूर आहे. मात्र इथे पोहोचण्यासाठी तब्बल चार तास लागतात. रस्ता नाहीच, नदी-नाले-पूर ओलांडून आदिवासींच्या आरोग्यासाठी जेव्हा आरोग्य कर्मचारी-पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते गावात पोहोचले तेव्हा ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरले. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव गडचिरोली जिल्ह्यातील दुसरं प्रशासकीय मुख्यालय म्हणजे अहेरी. अहेरी तसं संपन्न गाव आहे. मात्र या गावापासून केवळ 35 किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर गावात शेकडो आदिवासी नागरिक सध्या तापाच्या गोळीसाठी दिवसेंदिवस डॉक्टर अथवा परिचारिकेची वाट बघत असतात. ही स्थिती पावसाळ्यात अधिक बिकट असते. याच काळात रोगराईचं प्रमाण अधिक असतं. व्यंकटापूर येथील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक पोलीस ठाण्याच्या जवानांनी आरोग्य शिबीराचं आयोजन करण्याचं नियोजन केलं. अहेरी येथून सकाळी निघालेला आरोग्य चमू 12 वाजता गावात पोहोचणं अपेक्षित होतं. पण दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे तब्ब्ल चार तास उशिरा आरोग्य चमू गावात पोहोचला. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव संपूर्ण गाव चातकासारखी तज्ञ डॉक्टरांची प्रतीक्षा करत होतं. गावात पोहोचलेल्या चमूचं स्वागत करून थेट शिबीराचा प्रारंभ झाला. योग्य ती औषधे दिली गेली आणि काही वस्तूंचं मोफत वितरण देखील झालं. आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी हा अनुभव गडचिरोलीच्या दळणवळण व्यवस्थेचं विदारक वास्तव समोर आणणारा होता. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव केवळ 35 किमीचे अंतर कापण्यासाठी चमूला चार तास लागले. या भागात ना रस्ते आहेत, ना पूल. पावलोपावली केवळ चिखल, नदी-नाले आणि पुराचे पाणी. चमूला आपले साहित्य आणि उपकरणे नेण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. औषधे आणि इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी स्थानिकांची मोलाची मदत झाली. ही झाली गोष्ट सामान्य नागरिकांची आहे. मात्र नक्षल धोका लक्षात घेता इथल्या पोलीस जवानांना मात्र याशिवाय आपल्यासोबत शस्त्र आणि चौकस दृष्टी देखील ठेवावी लागते. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव पावसाळ्याच्या चार महिन्यात इथले नक्षलविरोधी अभियान राबवताना किती कष्ट उपसावे लागत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र व्यंकटापूर पोलीस, आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे शिबीर मोठ्या धाडसाने यशस्वी केलं. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव व्यंकटापूरचे आरोग्य शिबीर केवळ शिबीर नव्हतं. तो व्यवस्थेची जाणीव करून देणारा अनुभव होता. आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी यातील संकटे पेलून तो अधिक समृद्ध केला हे विशेष. पण या गडचिरोलीतील दुर्गम भागांनाही मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
Embed widget