एक्स्प्लोर
Advertisement
चिपळूणमध्ये बाप्पांसमोर खऱ्याखुऱ्या उंदिरमामाचा डान्स
नवी मुंबई / रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातल्या अलोरे गावातल्या घटनेवर आपल्या कुणाचाही विश्वास बसणार नाही. राजू चिपळूणकर यांच्या बाप्पांसमोर चक्क उंदिरमामाने डान्स केला आहे.
चिपळूणकरांच्या घरी आलेला हा उंदीर पाळीव नाही. तरीही तो बाप्पांसमोर बिनधास्त बागडत आहेत. बाप्पांसमोर ठाण मांडलेल्या या उंदीरमामांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी रांग लागली. अनेक जण घरी येऊन बाप्पासोबतच उंदराचंही दर्शन घेऊ लागला.
खरंच हा चमत्कार आहे का? की यामागेही काही विज्ञान आहे...? यावर आता उहापोह सुरु आहे. चिपळूणकरांच्या घरात आलेला उंदीर हा स्थिर नव्हता, तर त्याचा सारखा तोल जात होता. त्यामुळे त्या उंदरावर कशाचा तरी अंमल झाल्याचं भासत आहे.
त्या उंदराला नक्की काय झालं होतं याचं निदान आता शक्य नाही. कारण 12 तासांच्या पाहुणचारानंतर उंदीरमामा साऱ्यांच्या नजरा चुकवत रवाना झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
राजकारण
Advertisement