मूकबधिर तरुणांवर लाठीचार्ज केल्याचा शाप सरकारला लागेल, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
सरकार खाबूगिरी करण्यात गुंग आहे. अशा प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. केवळ पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकणे आणि पैसा कमवणे हा एकमात्र उद्देश या सरकारचा आहे. दुसऱ्या सरकारकडे बोट दाखवण्याचा अधिकार या सरकारला राहिला नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.
पुणे : पुण्यात मूकबधिर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. या मुलांला सरकारला शाप लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
आंदोलनकर्त्या तरुणांच्या मागण्या शिक्षणासंबधीच्या आहेत, चुकीच्या नाहीत. शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषेत शिकवणारे शिक्षक त्यांना हवे आहेत, अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. या तरुणांच्या मागण्या लवकरच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं.
ज्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही अशा तरुणांवर लाठिचार्ज झाला, ही दुर्देवी बाब आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, त्यांना शोधायला हवं. संबंधितांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. या असहाय्य तरुणांवर लाठीचार्ज केल्याचा शाप या सरकारला लागेल.
सरकार खाबूगिरी करण्यात गुंग आहे. अशा प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. केवळ पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकणे आणि पैसा कमवणे हा एकमात्र उद्देश या सरकारचा आहे. दुसऱ्या सरकारकडे बोट दाखवण्याचा अधिकार या सरकारला राहिला नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.
पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी आज पुण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्या तरुणांवर पोलिसांना लाठीचार्च करुन आंदोलन दडपडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वच स्तरातन या घटनेचा निषेध होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या
पुण्यात कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
देवेंद्र फडणवीस सरकार नाही, तर हे जनरल डायर फडणवीस सरकार आहे : सुप्रिया सुळे