एक्स्प्लोर
ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी
जळगाव जिल्ह्यात काही भागात तुरळक पावसाची हजेरी, औरंगाबादमध्येही पहाटे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पुण्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे.
मुंबई : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.
जळगाव जिल्ह्यात काही भागात तुरळक पावसाची हजेरी लावली, तर औरंगाबादमध्येही पहाटे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पुण्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे.
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरात पावसाच्या तुरळक सरी, कल्याणच्या मलंगगड परिसरातही पावसाने हजेरी लावली. कल्याण-डोंबिवलीतही पावसाचं वातावरण दिसून येत आहे.
नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. पनवेल, रोहा भागात रिमझिम सरी कोसळल्या. पेण, वडखळ, परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. रायगडमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement