एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माढ्यात पावसामुळे शेतकरी सुखावले, बेंबळेत बोअरवेलमधून पाण्याचे फवारे
पाण्याचा दाब मोठा असल्याने बोअरवेलच्या झाकणामधून पाण्याचे फवारे उडू लागले. त्यानंतर जगताप यांनी पाईपला भोके पाडून पाणी बाहेर येण्यासाठी वाट करुन दिली.
सोलापूर : सोलापुरातील ज्या भागात वरुणराजा कायमच पाठ फिरवतो, त्या भागात गेल्या चार-पाच दिवसात जोरदार पाऊस पडला. माढ्यातील बेंबळे भागात किती पाऊस पडला, याचं उत्तम उदाहरण म्हणजे याच भागातील एका शेतकऱ्याच्या शिवारातील बोअरवेलला आलेलं पाणी.
माढा तालुक्यातील बेंबळे परिसरातील प्रतिष्ठित बागायतदार राजेंद्र त्रिंबक जगताप यांना सुखद धक्का बसला आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे बोअरवेलमधून पाण्याचे अक्षरश: फवारे उडू लागले आहेत. बोअरवेलमधून बाहेर पडणारं पाणी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
राजेंद्र जगताप यांनी चार वर्षांपूर्वी 370 फूट घेतलेल्या बोअरवेलमधून पाणी वाहू लागले आहे. बेंबळे परिसरात जोरदार पाऊस पडल्याने बोअरवेलला पाणी आले आहे.
चार ते पाच दिवसांपासून माढ्यातील बेंबळे परिसरात चांगला पाऊस पडला. त्यामुळे जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने राजेंद्र जगतापांच्या बोअरवेलमधून पाणी आले.
पाण्याचा दाब मोठा असल्याने बोअरवेलच्या झाकणामधून पाण्याचे फवारे उडू लागले. त्यानंतर जगताप यांनी पाईपला भोके पाडून पाणी बाहेर येण्यासाठी वाट करुन दिली.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement