एक्स्प्लोर
संगमनेरमध्ये बेकायदेशीर गर्भपात, विशेष पथकाकडून छापा
शिर्डी : संगमनेरमध्ये एका नामांकीत हॉस्पिटलवर बेकायदेशीर गर्भपाताच्या संशयातून छापा टाकण्यात आला. या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केले जात असल्याची तक्रार आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार सापळा रचून गर्भपात सुरु असतानाच पथकानं छापा टाकला. तहसीलदारांसोबत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला.
संगमनेरमधील डॉ. निघूते यांच्या हॉस्पिटलवर दुपारपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. विशेष पथकानं टाकलेल्या छाप्यावेळी हॉस्पिटल प्रशासन दोषी आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. आज दुपारी 12 वाजता पथकानं हा छापा टाकला आहे.
संगमनेरमधील या हॉस्पिटलवर P. C. P. N . D . T आणि M. T. P कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. छापा टाकलेल्या विशेष पथकात तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पोलीस यांचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement