एक्स्प्लोर
दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही: विखे-पाटील

मुंबई: 'दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही.' अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. मनसे आणि शिवसेनेमध्ये आधीपासूनच छुपी जवळीक होती असा दावाही विखे-पाटलांनी केला आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, रविवारी मनसे नेते बाळा नांदगावकर हे युतीचा प्रस्ताव घेऊन 'मातोश्री'वर गेले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी ‘मातोश्री’ गाठली होती. नांदगावकरांनी राज ठाकरेंचा निरोप शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांना दिलं. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘मातोश्री’वर अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज ठाकरेंचा निरोप दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन कळवतो, असं शिवसेना नेत्यांनी बाळा नांदगावकरांना सांगितले. मात्र, ‘मातोश्री’कडून अद्याप कोणताही प्रतिसाद मनसेला मिळालेला नाही. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आजच म्हटलं होतं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतिहास घडेल. आता महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याकडे मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्या:
आणखी वाचा























