एक्स्प्लोर
नागपूरमध्ये माथेफिरुनं दोन चिमुकल्यांचे गळे कापले
नागपूर: नागपूरमध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका माथेफिरूने दोन चिमुकल्यांचे गळे कापल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर हल्लेखोरानंही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
५०० रुपये देण्यास आईने नकार दिला म्हणून तिच्या दोन चिमुकल्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समजते आहे. त्यानंतर माथेफिरूने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला.
दोन्ही चिमुकले आणि आरोपी यांना जखमी अवस्थेत नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अडीच वर्षांची निहारिक दिगंबर वाकोडे आणि तिचा पाच वर्षांचा भाऊ क्रिश दिगंबर वाकोडे हे दोघेही आरोपी विलास भुजाडेच्या घराशेजारी राहत होते. या दोन्ही कुटुंबामध्ये वाद असल्याचेही समजते आहे.
मुलांच्या आईचे म्हणणे आहे कि विलास हा तिच्याकडे ५०० रुपये मागायला आला होता. तिने नकार दिला असता त्याने मुलांना खाऊचं आमिष दाखवून गच्चीवर नेलं आणि तिथे त्यांचा गळा कापला. मुलांची आजी जेव्हा गच्चीवर गेली त्यावेली तिला मग आरोपीने स्वत:च्या गळ्यावर वार केले
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून ते पुढील तपास करीत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जालना
क्राईम
विश्व
Advertisement