एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून थेट शांताबाईच प्रचारात
पुणे : निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षिक करण्यासाठी उमेदवार वेगवेगळे फंडे वापरत आहेत. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी असाच काहीसा फंडा वापरला आहे.
सगळ्यांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या शांताबाईलाच या उमेदवारांनी प्रचारात उतरवलं आहे. "शांताबाई..अगं शांताबाई..गदादे पाटलाला तोडच नाही...शांताबाई," असे या प्रचाराच्या गाण्याचे शब्द आहेत.
पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 30 ब (जनता वसाहत-दत्तवाडी) इथून विद्यमान नगरसेविका प्रिया गदादे तर प्रभाग क्रमांक 30 ड (जनता वसाहत-दत्तवाडी) मधून त्यांचे बंधू प्रेमराज गदादे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
मात्र थेट शांताबाईला प्रचारासाठी उतरवल्याने दोन्ही उमेदवारांची जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रभागातील कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रचाराचा व्हिडीओ शेअर होत आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
राजकारण
कोल्हापूर
Advertisement